‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:49 AM2024-08-06T05:49:39+5:302024-08-06T05:50:00+5:30
मी गोरगरीब मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठे व्हावे, म्हणून लढता, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला.
वडीगोद्री (जि. जालना) : ज्यांना आरक्षणातले काही कळतच नाही, त्यांच्यावर आम्ही काहीच बोलत नाही, असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. ओबीसी नेत्यांना आमच्याविरोधात उभे केले. मराठ्यांना दोष द्यायचे काम तुम्ही करू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून राज यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

सगळे अपक्ष लढणार
२९ ऑगस्टला फक्त लढायचे की पाडायचे एवढेच ठरविले जाईल. सगळे गोरगरीब अपक्ष लढणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.