निर्व्यसनी व निरोगी तरुण हीच देशाची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:02 AM2020-02-05T01:02:46+5:302020-02-05T01:03:10+5:30
निर्व्यसनी व निरोगी तरुण हीच देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निर्व्यसनी व निरोगी तरुण हीच देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. ते येथील बलराम सांस्कृतिक क्रीडा व व्यायाम शाळेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ही स्पर्धा आझाद मैदानावर पार पडली. यावेळी नगरसेवक तथा शहरप्रमुख विष्णू पाचफुले, प्रदीप सर्गम, संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र मेघावाले, दिनेश भगत, दुर्गेश काठोठीवाले, राजू सरोदे, महेश तलरेजा यांची उपस्थिती होती. यावेळी तरुणांशी संवाद साधताना अंबेकर म्हणाले की, जुन्या काळात मोटारसायकल, स्वयंचलित वाहने कमी असल्याने प्रत्येक जण पायी फिरायचा. कामाच्या ठिकाणी पायी जायचा. घरातील सर्व कामे यंत्राव्दारे नव्हे तर शरीर श्रमातूनच केली जायची. ती आता होत नाहीत. त्यामुळे देखील आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर मेघावाले, दर्शन मेघावाले, जयराज खरे, अक्षय भारजवाल, योगेश दुधनकर आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत जालन्यासह अन्य आठ तालुक्यांतून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.