छत्तीसगडमधील स्टीलच्या वजन कपातीने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:27 AM2021-03-15T04:27:46+5:302021-03-15T04:27:46+5:30

परंतु हल्ली विदर्भात शेजारील छत्तीसगड राज्यातून आठ एम. एम. पासून ते ४८ एम. एम. पर्यंतचे स्टील विक्रीसाठी येत ...

The weight reduction of steel in Chhattisgarh calls into question the quality of construction | छत्तीसगडमधील स्टीलच्या वजन कपातीने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

छत्तीसगडमधील स्टीलच्या वजन कपातीने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Next

परंतु हल्ली विदर्भात शेजारील छत्तीसगड राज्यातून आठ एम. एम. पासून ते ४८ एम. एम. पर्यंतचे स्टील विक्रीसाठी येत आहे. परंतु हे स्टील येत असतांना त्या स्टीलच्या वजनात आणि आकारात किंचितसा बदल केला जात असल्याचे वास्तू तज्ज्ञांना लक्षात आले आहे. ही बाब खूप गंभीर असून, यामुळे बांधकामाचा दर्जा राखणे शक्य होत नाही.

एक उदाहरणच द्यायचे झाल्यास १२ एम. एम. लोखंडी गरज वापरतांना त्याचे वजन ठरवलेले आहे. त्यापेक्षा कितीतरी कमी वजनाच्या आकाराचे स्टील सध्या विदर्भाच्या बाजारपेठेत मिळत आहे. वजन कमी असल्याने त्याचे दर हे अन्य स्टील उत्पादकांपेक्षा कमी आहेत. हे दर कमी असल्याने महागडे स्टील घेणार कोण असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे कमी पैसे खर्च होत असल्याने स्टीलच्या दर्जाबाबत तडजोड करणे योग्य नसल्याचे जाणकारांनी सांगितले. ग्राहकांनी किमतीसोबतच दर्जाला महत्त्व देऊन स्टील खरेदी करण्याचे आवाहन जाणकरांनी केले आहे.

Web Title: The weight reduction of steel in Chhattisgarh calls into question the quality of construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.