जालन्यात जय हनुमानच्या जयघोषात नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:38 AM2019-01-02T00:38:32+5:302019-01-02T00:38:49+5:30
जालन्यात मात्तत्र पंडित मनोज महाराज गौड यांच्या प्रेरणेतून १९८८ पासून हनुमान चालिसाचे सामूहिक पठाण करून नववर्षाचे स्वागत केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संपूर्ण जगात नववर्षाचे स्वागत हे वेगवेगळ्या पातळीवर होत असते. जालन्यात मात्तत्र पंडित मनोज महाराज गौड यांच्या प्रेरणेतून १९८८ पासून हनुमान चालिसाचे सामूहिक पठाण करून नववर्षाचे स्वागत केले जात आहे.यंदही तशाच पघ्दतीने स्वागत करण्यात आले. संगीतमय हनुमान चालिसाच्या माध्यमातून सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजे पर्यंत असे १२ तास हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.
मधुशाला से मंंदिर तक ही संकल्पना घेऊन पंडित मनोज महाराज गौड यांनी या नाविन्यपूर्ण हनुमान चालिसा पठणाची परंपरा सुरू केली. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि आता तर ही एक लोकचळवळ बनली आहे.
येथील हॉटेल गॅलक्सीच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी या हनुमान चालिसा कार्यक्रमास प्रारंभ झाला होता. सलग बारा तास पंडित मनोज महाराज गौड व त्यांचा संच भजनांमध्ये मग्न होता. यावेळी हनुमान चालिसाचे १११ पाठ करण्यात आल्याचे पंडित मनोज महाराज गौड म्हणाले.