विद्यार्थ्यांसाठी पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:52 AM2018-06-16T00:52:37+5:302018-06-16T00:52:37+5:30

उन्हाळी सुटी नंतर शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये उघडली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्याने विद्यार्थी भारावून गेल्याचे दिसून आले.

Welcome to students | विद्यार्थ्यांसाठी पायघड्या

विद्यार्थ्यांसाठी पायघड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाळी सुटी नंतर शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये उघडली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्याने विद्यार्थी भारावून गेल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास २००० हजार आणि अन्य शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये शुक्रवारी अत्यंत उत्साही वातावरण होते. अनेक शाळांमध्ये मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटलेल्या दिसून आल्या, तर काही शाळांमध्ये वाजंत्रीच्या मंगलस्वरांनी विद्यार्थ्यांचे वेलकम करण्यात आले. या प्रवेशोत्सवामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी व पालकांसाठी संस्मरणीय राहणार आहे.
शुक्रवारी सकाळी येथील भाग्यनगर स्थित सुरेखा प्राथमिक शाळेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, पंडित भुतेकर, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी खरात, रवी जोशी, पी.आर. जाधव, संस्थेच्या अध्यक्षा वर्षा साहनी, सचिव उषाताई देशपांडे, विनित साहनी, अनुराग कपूर, पंचायत समितीचे सभापती पांडुरंग डोंगरे, मुख्याध्यापिका सविता कुलकर्णी, रवींद्र देशपांडे यांच्याह शिक्षक व पंचायत समिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाभरात सर्वत्र आनंदाचे वातारण होते. बुटखेडा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरणुक काढण्यात आली.
येथीलच संस्कार प्रबोधनी विद्यालयात वाजंत्रीच्या निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी प्रार्थनेस उभे असताना त्यांच्यावर पृष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक इश्वर वाघ, शिक्षक रामदास कुलकर्णी, किरण घुले, हिवाळे, कागवटे, रासवे, तडवी यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. येथील राष्ट्रीय हिंदी विद्यालय, सीटीएमके गुजराती विद्यालय, सरस्वती भुवन, कन्यापाठ प्रशाला, महावीर स्थानकवासी जैन विद्यालय, नाथानी हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, शांतीनिकेतन विद्यालय, जालना न.प. शाळा क्रमांक १, चंदनझिरा यांच्यासह शहरातील अन्य सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साही वातारणात स्वागत करण्यात आले.
बुटखेडा येथील कार्यक्रमाला जालना जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांच्यासह जाफराबाद पं. स. चे सभापती साहेबराव कानडजे, बुटखेडा येथील सरपंच रुखमीना पवार, पं. स. सदस्या गीता बोर्डे, शाळा समिती अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, प्राचार्य जगराम भटकर, अधिव्याख्याता डॉ. प्रकाश मांटे, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, गटविकास अधिकारी रमेश काळे, गटशिक्षणाधिकारी उमेश जैन, व्ही. व्ही. वडजे, सुनील मावकर, सुधीर जोशी, केंद्रप्रमुख गजानन मांटे, मुख्याध्यापक अंबादास तळेकर, शिक्षक विजय भानुसे, रावसाहेब चित्ते, पुंजाराम मुंढे, रामभाऊ कोल्हे, अर्चना बिलोरे, आश्रूबा जायभाये, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी निमा अरोरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
जालना शहरातील नगर परिषदेच्या शाळांमध्ये देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. काही शाळांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्हाभरातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये देखील जल्लोषपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

 

Web Title: Welcome to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.