व्हाॅट्सॲप ८, फेसबुक २, तर इन्स्टाग्रामद्वारे चौघांना गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 08:25 AM2021-06-28T08:25:43+5:302021-06-28T08:26:14+5:30

बनावट अकाउंट तयार करून मित्रांना भावनिक आवाहन करीत मेसेजद्वारे पैशांची मागणी केल्याचीही अनेक उदाहरणे समाेर आली आहेत

WhatsApp 8, Facebook 2, and Instagram ruined the four | व्हाॅट्सॲप ८, फेसबुक २, तर इन्स्टाग्रामद्वारे चौघांना गंडविले

व्हाॅट्सॲप ८, फेसबुक २, तर इन्स्टाग्रामद्वारे चौघांना गंडविले

Next
ठळक मुद्देदुसरीकडे ओटीपी व फोन पेद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

दीपक ढोले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : साेशल मीडियावर अश्लील फाेटाेंचा वापर, ब्लॅकमेलिंग, भावनिक आवाहन करून पैशांची मागणी, बदनामी करण्याच्या उद्देशाने अकाउंट हॅक करण्यात येत आहे. गेल्या पाच महिन्यांत ४० जणांची फसवणूक झाल्याचे जालना सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.  गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पाच महिन्यांत सर्वाधिक नागरिकांची फसवणूक झाली आहे.

बनावट अकाउंट तयार करून मित्रांना भावनिक आवाहन करीत मेसेजद्वारे पैशांची मागणी केल्याचीही अनेक उदाहरणे समाेर आली आहेत.  दुसरीकडे ओटीपी व फोन पेद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. जालना पोलिसांकडे गेल्या पाच महिन्यात अशा ४० तक्रारी आल्या आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाटस्‌प याच्या माध्यमातून फसवणूक केली जाते.सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करणारे आरोपी दिल्ली, हरयाणा तसेच काही परदेशांत असतात.

सायबरकडून जनजागृती
साेशल मीडियावरील आपले अकाउंट कसे सुरक्षित ठेवावे, यासाठी सायबर पोलीस वेळाेवेळी आवाहन करतात. परंतु त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. परिणामी, ते अलगद हॅकरच्या जाळ्यात सापडतात. पोलीस तपास करत असले तरी  तरी राेज तक्रारी नव्याने दाखल हाेत आहेत.

Web Title: WhatsApp 8, Facebook 2, and Instagram ruined the four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.