गहू आडवा; टरबूज फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:19 AM2018-02-13T01:19:00+5:302018-02-13T01:19:11+5:30

तालुक्यातील काही गावच्या शिवारात गारपिटीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेली पिके हातची गेली आहेत. सोमवारी थेट शेतात जाऊन महसूलच्या पथकाने पंचनामे सुरु केले आहेत.

Wheat;, watermelon damaged | गहू आडवा; टरबूज फुटले

गहू आडवा; टरबूज फुटले

googlenewsNext

शेषराव वायाळ/ परतूर : तालुक्यातील काही गावच्या शिवारात गारपिटीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेली पिके हातची गेली आहेत. सोमवारी थेट शेतात जाऊन महसूलच्या पथकाने पंचनामे सुरु केले आहेत.
तालुक्यात रविवारी दिवसभरात काही गावांत मोठी गारपिट झाली. ही गारपीट अचानक झल्याने शेतकरी गोंधळून गेले. माव, पाटोदा, काºहाळा, लिंगसा, वाहेगाव श्रीष्टी, हनवडी, गणेशपूर, सालगाव, मापेगाव, उस्मानपूर, टाकळी रंगोपंत, तोरणा आदी गावात गारपिटीने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. माव शिवारातील टरबुजाचे नुकसान होऊन, गहू, ज्वारी पूर्ण आडवे झाले. इतर गावांतही केळी, मोसंबी, गहु, हरभरा, ज्वारी, आंबा, द्राक्ष आदी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अगोदरच यावर्षी शेतकºयांच्या कोणत्याच शेती मालाला भाव नाही. कर्जाच्या खाईत सापडलेला शेतकरी आता सुलतानी संकटाबरोबरच आस्मानी संकटाचाही बळी ठरला आहे. शासनाने आता तात्काळ आर्थिक मदत देवून शेतक-यांना उभे राहण्यासाठी आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
..............
पंचनामे सुरू
परतूर तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे सुरू केले आहेत. या पथकात तहसीलदार डी. डी. फुफाटे, कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांचा समावेश आहे.
...........
आकडेवारी नंतर कळेल -फुपाटे
यासंदर्भात तहसीलदार डी. डी. फुफाटे म्हणाले की, आम्ही तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. शेतक-यांचे नुकसान बरेच झाले आहे. या पंचनाम्यातून नुकसानीचा आकडा बाहेर येईल. नुकसानग्रस्त शेतक-यांतून कोणी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असेही तहसीलदार फुपाटे यांनी सांगितले.
............

Web Title: Wheat;, watermelon damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.