बिबट्याचा बछडा पोलीस ठाण्यात धडकतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:33 PM2018-10-21T23:33:06+5:302018-10-21T23:34:25+5:30

कोणाविषयी काही तक्रार असेल तरच सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढतो. पोलिसांचे कायदे-कानून सारे माणसांनाच लागू पडतात. पण, अचानक एखादा प्राणी आणि तोही बिबट्या पोलीस ठाण्यात धडकला तर?

When the leopard hits the police station ... | बिबट्याचा बछडा पोलीस ठाण्यात धडकतो तेव्हा...

बिबट्याचा बछडा पोलीस ठाण्यात धडकतो तेव्हा...

Next

जालना : कोणाविषयी काही तक्रार असेल तरच सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढतो. पोलिसांचे कायदे-कानून सारे माणसांनाच लागू पडतात. पण, अचानक एखादा प्राणी आणि तोही बिबट्या पोलीस ठाण्यात धडकला तर?

त्याचे झाले असे की, सेवली, शिवनी, नेर, उंबरी, राठोड तांडा परिसरात मोठे जंगल आहे. हे जंगल विदर्भातील धाडपर्यंत पसरलेले आहे. या परिसरात आठ महिन्यांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते. तेव्हापासून या परिसरात या बिबट्याची दहशत कायम आहे. रविवारी सकाळी देखील हा बिबट्या दिसल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल काय झाला आणि सर्वत्र खळबळ उडाली.

भीतीचे वातावरण असतानाच रविवारी दुपारी सेवली परिसरातील रामचंद्र जोरावल आणि अरूण जोरावल या दोन शेतकऱ्यांना शेतातून येत असताना अचनाक बिबट्याचा हा बछडा आढळून आला. बछडा असल्याने त्यांनीही न घाबरता त्याला उचलले आणि थेट सेवली पोलीस ठाणे गाठले.

ही माहिती तातडीने जालना येथील वनविभागालाही देण्यात आली. सहायक वनसरंक्षक जी.एम. शिंदे यांनी तातडीने जालना येथील वन अधिकारी श्रीकांत इटलोड व त्यांच्या सहका-यांना सेवली येथे पाठविले. त्यांनी पोलीस ठाण्यात आणलेल्या बछड्याची पाहणी केली.

हा बछडा दीड महिन्याचा असावा असा अंदाज या अधिका-यांनी व्यक्त केला. या बछड्याला वनविभागाच्या अधिका-यांनी आपल्या ताब्यात घेतले आणि सेवली परिसरातील जंगलात सोडून दिले. बिबट्याची ही पोलीस ठाण्याची सैर दिवसभर परिसरात चर्चेत होती.

Web Title: When the leopard hits the police station ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.