खड्डे भरण्याचे टेंडर कुणाला दिले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:02 AM2018-04-01T01:02:12+5:302018-04-01T01:02:12+5:30
शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावर शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलचा गदरोळ झाला. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक रस्त्याची पाहणी करण्यास चला, अशी विनंती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावर शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलचा गदरोळ झाला. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक रस्त्याची पाहणी करण्यास चला, अशी विनंती केली. सभा संपल्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांनी या रस्त्याची पाहणी केली. शहरातील मंमादेवी ते रेल्वेस्थानक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात घडत असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. दोन दिवसांपूर्वीच खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने एका मुलाची जीभ तुटली असून, तो कोमात असल्याचे पाचफुले यांनी पालिकेच्या सभेत सांगितले. नगरपालिका दरवर्षी खड्ड्यांची डागडुजीचा करार करते. तरीही शहरात कुठेच कामे झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा पैसा जातो कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राऊत, मुख्याधिकारी खांडेकर, भास्कर दानवे आदींनी रेल्वेस्थानक रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली. हे खड्डे त्वरित बुजविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिका-यांनी दिली.