ऑक्सिजन हवा का ऑक्सिजन...साठवणुकीचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:10+5:302021-05-30T04:24:10+5:30
तसेच जालन्यातील ऑक्सिजनचे उत्पादक संजयकुमार अग्रवाल यांचीही यासाठी मोठी मदत झाली. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात ...
तसेच जालन्यातील ऑक्सिजनचे उत्पादक संजयकुमार अग्रवाल यांचीही यासाठी मोठी मदत झाली. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर उद्योगांना देण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. त्यामुळे मध्यंतरी जालन्यातील विशेष करून स्टील इंडस्ट्री अडचणीत सापडली होती. यासाठी काहींनी तर चक्क हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथून ऑक्सिजन आणण्याची तयारी केली होती. तेथून आणलेला ५० टक्के ऑक्सिजन हा कोरोना रुग्णांना देणे बंधनकारक करण्यात आले होते. ते देखील उद्योजकांनी मान्य केले होते. नंतर तर येथील पोलाद स्टीलने विक्रमी १९ दिवसांत हवेतून ऑक्सिजन घेणारा प्लांट सुरू करून मोठा दिलासा दिला होता. या प्लांटमधील सर्व सिलिंडर हे कोरोना रुग्णांसाठी व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्रवाल यांनी नि:शुल्क दिले होते.
आज ऑक्सिजनचा पुरवठा हा जालन्यासह जवळपास सर्वत्र सुरळीत झाल्याची माहिती संजय अग्रवाल यांनी दिली. जिल्हा सरकारी रुग्णालये, तसेच ग्रामीण भाग आणि खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना आता खूप कमी ऑक्सिजनची गरज पडत आहे. ती गरज पूर्ण होऊन आज जालन्यात ऑक्सिजन शिल्लक राहत असल्याचे ते म्हणाले.
चौकट
आणखी चार ऑक्सिजन प्लांटची उभारणी
जालन्यातील पोलाद स्टीलनंतर आता ओम साईराम, कालिका स्टील, एसआरजे स्टील, ऑयकाॅन स्टील हे देखील पोलादच्या धर्तीवर ऑक्सिजन प्लांट उभारत आहेत. त्यांचे प्लांट पुढील महिन्यात प्रत्यक्ष कार्यान्वित होतील असे सांगण्यात आले.