पत्नीवर अत्याचार करून ऑडीओ क्लिप व्हायरल; बदनामीच्या भीतीने पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 03:12 PM2022-11-21T15:12:46+5:302022-11-21T15:34:45+5:30
बदनामीच्या भेटीने पतीने केली आत्महत्या
भोकरदन (जालना) : पत्नीवर अत्याचार करून तिच्यासोबत बोलण्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने बदनामीच्या भीतीने पतीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे घडली. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिलांनी पीडीतेला रवी दत्तात्रय सपकाळ यांच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. शिवाय तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर पीड़ित महिला आणि संबंधित संशयित आरोपी तरुण यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडीत महिलेच्या पतीला पाठवल्या. त्यामुळे बदनामी झाल्याच्या समजातून पीड़ित महिलेच्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पारध पोलीस ठाण्यात गजानन अशोक देशमुख, रवी दत्तात्रय सपकाळ, गजानन दिलीप शिरसाठ आणि अन्य दोन महिला विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे बलात्कार, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेकर करीत आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.