पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:51 PM2021-11-24T12:51:21+5:302021-11-24T12:55:14+5:30

Son-in-law killed his mother-in-law in anger : पत्नी घरी नसताना माहेरी येऊन केला चाकू आणि फरशीने हल्ला

Wife, children stays at her mother's home; Son-in-law killed his mother-in-law in anger | पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

googlenewsNext

जालना : पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून व चाकूने वार करून खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर भागात घडली.

सखुबाई बिरजूलाल काळे (७५, रा. मार्बल पॅलेस, प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात मयत महिलेची मुलगी ज्योती विजय धिल्लोड यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील संग्रामनगर बसस्थानक भागात राहणाऱ्या ज्याेती धिल्लोड या सोमवारी कामावर गेल्या होत्या. रात्री त्या घरी गेल्या असता त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले. मुलांकडे विचारणा केल्यानंतर मुलांनी वडील विजय किशन धिल्लोड (रा. भीमनगर भावसिंगपुरा, औरंगाबाद) यांनी सखुबाई काळे यांना फरशी, चाकूने मारहाण केल्याचे सांगितले. विजय धिल्लोड याने पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून सखुबाई काळे यांचा खून केल्याची तक्रार ज्योती धिल्लाेड यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि. रमेश रूपेकर हे तपास करीत आहेत.

जावई कोठडीत
घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. घटनेनंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय धिल्लोड याला गांधीचमन भागातून अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजार केले असता त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोउपनि. रमेश रूपेकर यांनी सांगितले.

Web Title: Wife, children stays at her mother's home; Son-in-law killed his mother-in-law in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.