संकटसमयी एकाकी सोडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:42 AM2018-02-15T00:42:28+5:302018-02-15T00:42:44+5:30
शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते.
टेंभुर्णी: अचानक उदभवलेल्या या नैसर्गिक संकट समयी गारपीट ग्रस्ताना एकाकी सोडणार नाही. शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते.
यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार जे. डी. वळवी, गटविकास अधिकारी रमेश काळे, सभापती साहेबराव कानडजे, गोविंद पंडित, विजय परिहार, संतोष लोखंडे उपस्थित होते.
प्रथम निवडुंगा येथील गारपिटीने मयत झालेले वृद्ध आसाराम जगताप यांच्या घरी भेट देऊन खा. दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शासनातर्फे चार लाख तर भाजपा प्रदेश महाराष्ट्र तर्फे एक लाख अशी एकूण पाच लाखांची आर्थिक मदत खा. दानवे यांच्या हस्ते मृताच्या पत्नीला देण्यात आली. या भेटीत दानवे यांनी सातेफळ, निवडुंगा, पोखरी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना त्वरित शासन स्तरावरून आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.