सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Published: September 4, 2023 04:33 PM2023-09-04T16:33:58+5:302023-09-04T16:34:27+5:30

शिष्टमंडळ विजयाचे पत्र घेवून येईल अशी आशा; आंदोलकांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे मागे घ्या

Will wait for the government's GR; Don't just have meetings, don't read first notes: Manoj Jarange | सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे

सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे

googlenewsNext

जालना : उपोषणस्थळी येणारे शिष्टमंडळ राज्यातील मराठा समाज बांधवाला आरक्षण दिल्याचा जीआर घेवून येईल, अशी आम्हाला आशा आहे. आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घ्यावेत. शासनाने योग्य निर्णय घेतला नसेल, आरक्षणाचा जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी पिणेही सोडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे आमच्या लक्षात आले आहेत. आरक्षणारच्या बाबतचा निर्णय झालेला नसावा. आपण आता त्यांचे लोकं येईपर्यंत वाट पाहू. अधिकृत मांडणी त्यांनीच केलेली बरी. चर्चेसाठी बैठकाचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुऱ्हाळ तेच, हे आताच्या आंदोलन करणाऱ्या पिढीला अपेक्षित नाही. चर्चेशिवाय पर्याय नाही. परंतु, त्याचा अर्थ असा नाही की पहिले पाढे पंचावन्न असावेत. सरकारचे शिष्टमंडळ मराठ्यांच्या विजयाचा कागद, आरक्षणाचे पत्र घेवून येईल, अशी आम्हाला अशा आहे. आम्ही सरकारच्या शिष्टमंडळाची आणि निरोपाची देवासारखी वाट पाहत आहोत. परंतु, आरक्षणाचा जीआर आला नाही तर उद्यापासून पाणी पिणेही बंद करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला.

तर आरक्षणाची दिशा परवा ठरवू
मराठा समाजातील तरूणांच्या कणाकणात ऊर्जा आहे. त्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळत आहे. आरक्षण मिळेपर्यंत आपण थांबणार नाही. आरक्षणाबाबत योग्य निर्णय न झाल्यास उद्यापासून पाणी पिणे बंद करणार असून, बुधवारी आरक्षणाची पुढील दिशा ठरविली जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Web Title: Will wait for the government's GR; Don't just have meetings, don't read first notes: Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.