कंटेनरखाली चिरडून महिलेचा पाय निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:04 AM2019-03-06T01:04:14+5:302019-03-06T01:04:36+5:30

दुचाकीवरून पडून कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिलेच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने डावा पाय निकामी झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात सकाळी घडली.

The woman's foot was broken by the container | कंटेनरखाली चिरडून महिलेचा पाय निकामी

कंटेनरखाली चिरडून महिलेचा पाय निकामी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : दुचाकीवरून पडून कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिलेच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने डावा पाय निकामी झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात सकाळी घडली. कमलबाई कोकणे असे जखमी महिलेचे नाव आहे.
बीडहून औरंगाबादकडे कंटेनर (एन.एल. ०१.क्यू. ५५०३७) जात असतांना शहागड (ता.अंबड) येथील जुना बसस्थानक परिसरात मोटरसायकलवरून (एम.एच.२० .एस.२९२७) एक दाम्पत्य धोंडराई, ता.गेवराईहून अंबडकडे जात होते. शहागड येथे दुचाकी चालकाने कंटेनेरला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून आलेल्या एका मोटरसायकलने जोराची धडक दिली.
या जोराच्या धडकेनंतर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या कमलाबाई कोकणे खाली पडल्याने त्यांच्या डाव्या पायावरुन कंटेनरचे चाक गेले. यामुळे त्यांचा डावा पाय निकामी तर उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
अपघातानंतर अज्ञात मोटारसायकलस्वार घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी कमलबाई कोकणे यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान जमादार सय्यद नासिर, पो.कॉ. महेश दाभाडे, गणेश बुजाडे यांनी कंटेनरसह चालक अर्शद याला ताब्यात घेतले. जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The woman's foot was broken by the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.