महिलेचे दागिने लांबविले, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:59+5:302021-03-13T04:54:59+5:30
जालना : महिलेची दिशाभूल करून दागिने लांबविणाऱ्या एका विरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेगम शेख शब्बीर असे ...
जालना : महिलेची दिशाभूल करून दागिने लांबविणाऱ्या एका विरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेगम शेख शब्बीर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना तुमचे निराधार योजनेचे पैसे बँकेत आले आहेत, असे म्हणत तुमचे दागिने बँकेत दाखविण्यासाठी काढून द्या, असे सांगून फसवणूक केली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ................
जालना जिल्ह्यात पावसाची शक्यता
जालना : मराठवाड्यासह विदर्भात पुढील आठवड्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरभरा आणि कांदा पीक काढून घ्यावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
...............
कोरोना लसीकरणास रांजणीत सुरूवात
रांजणी : रांजणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास नुकताच प्रारंभ झाला. पहिला डोस जुल्फेकार अली मोहंमद अली यांना देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे, डॉ. प्रिया गोरकर, सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच शेख रहिम, आरोग्य सेविका मिरा गाढवे यांची उपिस्थती होती.
.................
महिला दिनानिमित्त मास्कचे वाटप
भोकरदन : तालुक्यातील वरूड बु. येथे महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्या विद्या वाघ यांच्या पुढाकारातून गावातील महिलांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच कौशल्याबाई सिरसाट, अनिता बावस्कर, चंद्रकलाबाई साळवे, भाले यांची उपस्थिती होती.
..............
जांब समर्थ येथे आठवडे बाजार
घनसावंगी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या गावातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जांब समर्थ गावातच बाजार भरविण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांची बाजारात आपला भाजीपाला आणला होता. ग्राहकांनीही येथे खरेदी केली.
.................
काढून ठेवलेले हरभरा पीक जळाले
बदनापूर : तालुक्यातील धोपटेश्वर शिवारात परमेश्वर बाबूराव दाभाडे या शेतकऱ्याने काढून ठेवलेले २५ क्विंटल हरभरा पीक आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून गेले. यामुळे दाभाडे यांचे जवळपास एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
..............
मटका खेळविणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल
जालना : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे एका पानटपरीवर मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार केलेल्या कारवाईत संशयित आरोपी कैलास खरात हा पैसे घेऊन मटका खेळवित असल्याचे निदर्शनास आले. पोलीस कर्मचारी विकास जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...................