सोशल मीडियावरही महिलांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:20+5:302021-07-23T04:19:20+5:30
जालना : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिलांचा छळ होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी महिला ...
जालना : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिलांचा छळ होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी महिला तक्रार देत नसल्याचे समोर आले आहे. अनाेळखी व्यक्तीशी मैत्री होते. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. काही दिवसांनंतर मोबाइलवर अश्लील व्हिडीओ काढून महिलांचा छळ केला जातो. काहीजण महिलांकडे पैशांची मागणीदेखील करतात. जिल्ह्यात महिलांचा छळ झाल्याची तक्रार दाखल नसली, तरी बदनामीच्या भीतीपोटी महिला तक्रार देत नाही.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
n काही जण फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मुलींना प्रेमाचे आमिष दाखविले जाते. काही दिवसांनी मोबाइलवर अश्लील व्हिडीओ काढला जातो. बदनामीच्या भीतीपोटी अनेक महिला व मुली तक्रारी दाखल करीत नसल्याचे सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही तक्रार नाही.
येथे करा
तक्रार
महिलांचा सोशल मीडियावर छळ होत असल्यास त्यांनी न घाबरता तक्रार करावी.
कुठल्याही पोलीस ठाण्यात किंवा सायबर विभागाकडे अर्ज करावा. ही माहिती गुप्त ठेवली जाते.
सायबर विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला जेरबंद केले जाते.
एकही तक्रार नाही
सोशल मीडियाद्वारे महिलांचा छळ होत आहे. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी अनेक महिला तक्रारी देत नाही. त्यामुळेच जिल्ह्यात एकही तक्रार नाही.
- मारुती खेडकर, सायबर सेलप्रमुख कोट