महिलांचा हल्लाबोल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:20 AM2018-06-21T01:20:00+5:302018-06-21T01:20:00+5:30

धामणगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत होते. बुधवारी संतप्त झालेल्या रणरागिणींनी दारूच्या ठेक्यात घुसून सर्व दारूच्या बाटल्या घराबाहेर आणून फोडल्याने एकच गोंधळ उडाल्याने विक्रेत्यांनी तेथून पळ काढला यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Women attack on wineshop | महिलांचा हल्लाबोल...

महिलांचा हल्लाबोल...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : धामणगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत होते. बुधवारी संतप्त झालेल्या रणरागिणींनी दारूच्या ठेक्यात घुसून सर्व दारूच्या बाटल्या घराबाहेर आणून फोडल्याने एकच गोंधळ उडाल्याने विक्रेत्यांनी तेथून पळ काढला यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
घनसावंगी तालुक्यातील धामणगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून, या दारूमुळे अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत, महिला व विद्यार्थिनींना रस्त्यावर चालणे कठीण झाले होते. गेल्या आठवड्यात दोन तीन तळीरामांमध्ये कोयत्याने मारहाण होऊन त्यात गोविंद शिंदे जखमी झाल्याचा गुन्हा घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
याकडे पोलीस प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याने दारू विक्रते सध्या सार्वजनिक ठिकाणी मंदिर परिसर, मुख्य रस्त्यावर, स्मशानभूमी इ. जागांवर बेधडक अवैध दारू विक्री करत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही दारू बंद होत नसल्याने रणरागिणी बुधवारी दारूच्या तीन ठेक्यावर जाऊन त्यांनी दारूचे बाँक्स रस्त्यावर आणून फोडले.
या बाबत उपनिरीक्षक संपत पवार म्हणाले की, आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले होते.

Web Title: Women attack on wineshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.