महिला, बाल रुग्णालय ठरणार वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:56 AM2017-12-20T00:56:34+5:302017-12-20T00:56:57+5:30
जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून उभारण्यात येत असलेल्या येथील जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून उभारण्यात येत असलेल्या येथील जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे हे रुग्णालय जालना जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील गरोदर माता व बाल रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.
जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात येणा-या रुग्णांची संख्या अधिक आहेत. या ठिकाणी महिन्याकाठी सुमारे ५०० प्रसूती होतात. तसेच एका महिन्याच्या आतील बाल रुग्णांची संख्याही अधिक असते. सध्या कार्यान्वित असलेल्या या रुग्णालयाची क्षमता केवळ ६० रुग्णांची आहे. तर बालकांच्या अतिदक्षता विभागात एका वेळी १६ बालकांवर उपचार करता येऊ शकतात. मात्र शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून महिला रुग्णालयात प्रसुतीसाठी येणा-या महिलांची संख्या मोठी आहे.