महिला सक्षमीकरण जागर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:52 AM2018-03-08T00:52:48+5:302018-03-08T00:53:08+5:30
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्चला कल्याणराव घोगरे स्टेडियम याठिकाणी महिला सक्षमीकरणाचा जागर कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्चला कल्याणराव घोगरे स्टेडियम याठिकाणी महिला सक्षमीकरणाचा जागर कार्यशाळा घेण्यात आली.
याच्या उदघाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, सरकारी वकील वर्षा मुकीम, डॉ. रीना सरकटे, माया सुतार उपस्थित होते. सर्वप्रथम नाव नोंदणी, महिलांचे हिमोग्लोबिन, कॅल्शियमची तपासणी करण्यात आली. स्त्रीभ्रूण हत्येवर व महिला सक्षमीकरणावर नाटिका सादर करण्यात आल्या. तसेच बेटीया,महिला शिक्षणावर गीत सादर करण्यात आले. प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी प्रास्ताविकात महिला सक्षमीकरणाचा जागर या कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. महिला सक्षमीकरणाचा जागर हे लक्षणीय कार्य हाती घेतलेले आहे. यात नक्कीच यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन छाया सूर्यवंशी व आभार प्रदर्शन व्यवसाय प्रशिक्षक शेळके यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रामदास जगताप, योगिता माटे, व्यवसाय प्रशिक्षक उषा मगर, शेख समीना, मोहम्मद फरहीन, बोर्डे रेखा, शेख आरेफा, कोकणे रुपाली , घाटेकर अर्चना, भागीरथी उकाडे, साधना मुळे, रायमल दत्तात्रय, राजू राठोड व स्वयंसेवक शिक्षक व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.