महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:26 AM2018-01-17T00:26:49+5:302018-01-17T00:28:06+5:30
योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून ख-या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी महिलांनी संघटित प्रयत्न करून आर्थिक सक्षम बनावे, असा सूर मंगळवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात महिलांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत उमटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र व राज्य शासनार्फे महिला, बचतगटांच्या प्रगतीसाठी अनेक योजना आहेत.या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून ख-या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी महिलांनी संघटित प्रयत्न करून आर्थिक सक्षम बनावे, असा सूर मंगळवारी फुलंब्रीकर नाट्यगृहात महिलांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत उमटला.
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा पुरवठा विभाग, हक्कदर्शक एम्प्लॉयमेंट सोलूशन मुंबई, आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील फुलंब्रीकर नाट्यगृहात मंगळवारी या जिल्हास्तरीय महिला कार्यशाळेत आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर हे होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, पशुसंवर्धन उपायुक्त बुक्तरे, समन्वय अधिकारी उमेश कहाते, नवरत्न संस्थेचे अध्यक्ष शेख महेमूद, उद्योग निरीक्षक शिंदे, कृषी विभागाच्या उपसंचालिका चिखले, प्रा. रेणुका भावसार, हक्क दर्शक साथीच्या प्रियंका वझे, मोहन इंगळे, रोहीत बनवसकर यांची प्रमुख उपस्थीती होती.
या वेळी बुक्तरे यांनी महिलांशी संबंधित विविध आर्थिक योजनांची माहिती दिली.