प्लास्टिक बंदीचे महिलांकडूनही स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:07 AM2018-06-25T01:07:47+5:302018-06-25T01:07:53+5:30
या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्लास्टिक बंदीचा राज्य सरकारचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज या नवीन निर्णयामुळे अडचण जाणवत असली तरी, हळूहळू ती सवय आपल्याला लागेल यात शंका नाही. पूर्वीप्रमाणे बाजारात खरेदीसाठी जाताना घरून पिशवी नेण्याची पध्दत पुन्हा रूढ होणार आहे. प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने आणि त्याचा अतिवापर झाल्याने एकूणच पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले.
सरकारने हा योग्य निर्णय घेतला आहे. प्रदूषणासाठी प्लास्टिक हे प्रमुख कारण असल्यामुळे त्यावर बंदी यायलाच हवी. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दिसून येते. जनावरे अन्नाच्या शोधात त्या कच-यातील प्लास्टिकही खातात. त्यामुळे त्यांना आजार होऊन ब-याचवेळा त्यांचा जीवही दगावतो. प्लास्टिककडे लोक फक्त सुविधा म्हणून बघतात. पण त्यामागील पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होणाºया परिणामाकडे कोणीच लक्ष देत नाही.
-मंगल जानराव साटोटे
प्लास्टिक बंदीचा निर्णय सरकारने योग्यच घेतला आहे, परंतु त्यावर असलेला दंड हा सर्वसामान्य व्यक्ती भरू शकेल का, हा प्रश्नच आहे. कारण काही वयस्कर व्यक्तीच्या हातात प्लास्टिक बॅग दिसून आली व नियमानुसार त्यावर कारवाई झाली पण, त्याची आर्थिक स्थिती दंड भरण्याची नसेल यावेळेस सरकार काय निर्णय घेईल हा प्रश्नच आहे. - आशा सुहास पालकर
प्लास्टिक बंदी लागू ही चांगली बाब आहे, परंतु पर्यावरणासाठी आणि माणसांसाठी प्लास्टिक कशाप्रकारे हानीकारक आहे हे इतरांना सांगण्याची गरज आहे, त्याचा जोमाने प्रचार-प्रसार केला पाहिजे.
- अनुराधा हेरक र