दारूबंदीसाठी महिलांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:51 AM2018-11-14T00:51:13+5:302018-11-14T00:51:33+5:30
पाटोदा (बु.) या गावातील दारू तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी गावातील १०० ते १५० महिलांनी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पाटोदा (बु.) या गावातील दारू तात्काळ बंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी गावातील १०० ते १५० महिलांनी मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
पाटोदा (बु.) ता. मंठा येथे दिवसेंदिवस अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तसेच दारू पिणा-यांचीही संख्याही येथे वाढत आहे. याचा त्रास महिलांना होत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून पुरूष दारू पिऊन घरी आल्यानंतर महिलांना त्रास देतात. घरामध्ये भांडने करतात. मुलांना हाणमार करतात. असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मंगलबाई पाईकराव, आसराबाई घोडे, निलाबाई शेंदाडे, सावित्राबाई शेंदाडे, जानकाबाई कांबळे, निलाबाई कांबळे, आसराबाई जावळे, जानकाबाई गायकवाड, सुशिलाबाई खंदारे, आसराबाई कांबळे, शांताबाई कांबळे, प्रयागाबाई कांबळे, वैजंता कांबळे, सुमन कांबळे, निर्मळा कांबळे, शिंदु हिवाळे, मंडाबाई कांबळे, रंजना कांबळे, वर्षा कोल्हे, शिंदुबाई कांबळे, कौसाबाई उंडे, सुनिता उंडे, सुनिता ठाले, सावित्राबाई कांबळे, राधाबाई कांबळे, सुनिता कांबळे, आसराबाई घोडे, रंजना कांबळे, मंजुळा कांबळे, संजिवनी काकडे आदी महिलांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.