वालसावंगी येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:30+5:302021-03-05T04:30:30+5:30
वालसावंगी परिसरातील गावांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी येथे ३३ केव्हीचे विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या ...
वालसावंगी परिसरातील गावांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी येथे ३३ केव्हीचे विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महावितरणने येथे ३३ केव्हीच्या उपकेंद्राला मंजुरी देखील दिली. या उपकेंद्राचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात झाले. कामही सुरू झाले. परंतु, काही कारणात्सव काम बंद पडले. तेव्हापासून आतापर्यंत या उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले नाही.
येथील उपकेंद्राला बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथून वीज पुरवठा होणार आहे. मात्र, मासरूळ (जि. बुलडाणा) येथील काही शेतकऱ्यांनी वीज पोल उभारण्यास नकार दिला होता. त्यामुळे वादही झाला होता. त्यानंतर हे काम सुरूच झाले नाही. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी फिडरमधील तार व ऑईल चोरून नेले होते. तेव्हाच येथील फिडर काढून नेण्यात आले आहे.
===Photopath===
040321\04jan_8_04032021_15.jpg
===Caption===
वालसावंगी येथील उपकेंद्र