बालसाहित्य लिहायला विचारांची कसोटी लागते- कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:47+5:302021-03-07T04:27:47+5:30
शहरातील भाग्यनगर येथे शुक्रवारी गोल्डन ज्युबिली शाळेतील शिक्षक डॉ. नंदकिशोर डंबाळे यांच्या बालनाटिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ...
शहरातील भाग्यनगर येथे शुक्रवारी गोल्डन ज्युबिली शाळेतील शिक्षक डॉ. नंदकिशोर डंबाळे यांच्या बालनाटिका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी विचारवंत प्रा.बी.वाय. कुलकर्णी, शिक्षण तज्ज्ञ एम.जी.जोशी, साने गुरुजी कथामाला शाखेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलकर्णी म्हणाले की, आजच्या तंत्रज्ञान युगात बालसाहित्य लेखनाच्या कक्षा विस्तारत आहेत. लेखनाची ही कसोटी ज्याला जमते तोच उत्तम बालसाहित्य लिहू शकतो, असेही त्यांनी सांगितले. पुस्तक लेखनामागील भूमिका डाॅ. नंदकिशोर डंबाळे यांनी मांडली.
बालसाहित्यात विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी, याकरिता नेत्रदान, कोरोना संकट आणि स्वच्छता या विषयावर लघुनाटिका असणारे पुस्तक लिहिले. पुस्तकाचा ब्लॉग प्रसिद्ध बाल साहित्यिक प्रा. डॉ. विशाल तायडे यांनी लिहिला आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. बी.वाय. कुलकर्णी, प्रा. एम.जी. जोशी, एस.एन. कुलकर्णी, प्रा. डॉ. सुहास सदाव्रते, मुकुंद देशमुख, रमेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार तुकाराम धुमाळ यांनी मानले.
===Photopath===
060321\06jan_27_06032021_15.jpg
===Caption===
बालसाहित्य