यंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:48 AM2018-05-16T00:48:26+5:302018-05-16T00:48:26+5:30

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामुदायिक पध्दतीने लावून त्यांना आधार देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष उपक्रम राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त एस. जी. डिघे यांनी राबविला होता. मात्र, त्यांच्या या उपक्रमास जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.

This year, the community marriage ceremony started | यंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुहूर्त हुकला

यंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुहूर्त हुकला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामुदायिक पध्दतीने लावून त्यांना आधार देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातर्फे विशेष उपक्रम राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त एस. जी. डिघे यांनी राबविला होता. मात्र, त्यांच्या या उपक्रमास जिल्ह्यात पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.
राज्यातील विविध मंदिरांकडे मोठ्या प्रमाणावर रोख स्वरूपात देणगी येते. त्यातील काही हिस्सा हा त्यांनी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी द्यावा असे आवाहन डीघे यांनी केले होते. त्यानुसार येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अशा प्रकारचा सोहळा यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली केली होती, त्यात १९ जणांचा समावेश होता. या समितीने शैक्षणिक तसेच मंदिराच्या विश्वस्तांच्या बैठका घेऊन या विवाहसोहळ्यासाठी गावापातळीवर संपर्क करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलींचा शोध घेण्यासह निधी संकलनासाठी प्रयत्न केले. त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयास कळवले. तसेच यासाठी साडेचार लाख रूपयांचा निधी जमा झाला होता तर विवाहासाठी केवळ दोन जणांची तयारी असल्याने हा विवाह सोहळा सामुदायिक होत नसल्याने, या दोन जोडप्यांना औरंगाबाद येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात पाठवून त्यांचे लग्न लावून देण्यात आले. एकूणच राजकीय हेवेदावे तसेच उत्पन्न असणा-या देवस्थानांकडूनही यासाठी हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने एका चांगल्या उपक्रमाला पहिल्याच वर्षी अल्प प्रतिसाद मिळाला.

Web Title: This year, the community marriage ceremony started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.