जालन्यात येलो अलर्ट! ५ मे पर्यंत वाहणार ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे

By विजय मुंडे  | Published: May 3, 2023 07:32 PM2023-05-03T19:32:14+5:302023-05-03T19:32:32+5:30

विजेच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

Yellow Alert! Winds up to 40 kilometers per hour will blow till May 5; Chance of rain with lightning | जालन्यात येलो अलर्ट! ५ मे पर्यंत वाहणार ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे

जालन्यात येलो अलर्ट! ५ मे पर्यंत वाहणार ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे

googlenewsNext

जालना : शेतकरी, सर्वसामान्यांची झोप उडविलेल्या वादळी वारे, अवकाळी पावसाचे काही थांबण्याचे नाव नाही. हवामानशास्त्र केंद्राच्या वतीने जिल्ह्यात पुन्हा ५ मे पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तासी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

वादळी वारे, पावसात मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकलपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर रहावे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनशी साधा संपर्क
आपत्कालीन परिस्थितीत जवळील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला (क्र. ०२४८२-२२३१३२) माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.

मोकळ्या जागेत घ्या काळजी
विजा चमकत असताना आपण मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, याची काळजी घ्यावी.

Web Title: Yellow Alert! Winds up to 40 kilometers per hour will blow till May 5; Chance of rain with lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.