दोन एकर शेतात काढले अंजिराचे लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:48 AM2019-05-28T00:48:28+5:302019-05-28T00:48:42+5:30

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले

The yield of millions of figs taken out of the two acres of land | दोन एकर शेतात काढले अंजिराचे लाखोंचे उत्पन्न

दोन एकर शेतात काढले अंजिराचे लाखोंचे उत्पन्न

googlenewsNext

राजू छल्लारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाजी गोविंद दुरांडे असे या शेतक-याचे नाव आहे.
पारंपरिक पीक पद्धतीत शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नसल्याने परिसरातील अनेक शेतकरी हे फळबागांकडे वळले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक शेतकरी मार्ग काढत आहे. धाकलगाव येथील दुरांडे यांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या दोन एकर शेतात अंजिराची लागवड केली. त्यांनी जवळपास ३०० अंजिराच्या झाडांची लागवड केली. आंतरपीक म्हणून त्यांनी पेरूची २५, फणस ५, ड्रायगन फूड १०, आंबे १०, सीताफळाच्या ११ झाडांची लागवड केली. लागवडीसाठी त्यांना ९० हजार रुपये खर्च आला. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ३२ क्विंटल अंजिराचे उत्पन्न काढले. या अंजिरांना बाजारात १० हजाराचा भाव मिळाला. यातून त्यांना तीन लाख २० हजारांचे उत्पन्न मिळाले.
शेतीतून पाहिजे तसे उत्पादन मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, हवामानातील चढउतार आणि तज्ञांच्या भेटी यातून चांगले उत्पादन सहज शक्य आहे. आज दोन एकरांची त्यांची शेती अनेक शेतक-यांना नवी दिशा आणि नवी प्रेरणा देणारी ठरत आहे. यासाठी त्यांना आई जानकाबाई, भाऊ ज्योतिबा गोविंद दुरांडे, पत्नी आशा, वहिनी सविता, मुले महेश व मुकेश यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. दुरांडे यांनी फुलविलेली अंजीर शेती अनेकांच्या दृष्टीने नवा आदर्श ठरत आहे. हे करत असताना त्यांना कृषी सहायक व्ही. एस. कड यांचे मार्गदर्शन घेतले.

Web Title: The yield of millions of figs taken out of the two acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.