तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:45 AM2019-02-04T00:45:54+5:302019-02-04T00:46:56+5:30
जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. ...
जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. मराठवाड्यात खूप कमी दूध उत्पादन होते. याकडे संधी म्हणून शेतकºयांनी पाहावे. तुम्हाला मार्केटची चिंता असेल तर काळजी करू नका. तुम्ही दूध उत्पादन वाढवा, मी मुंबईत मार्केट उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही युवा शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारच्या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्या शिरल्याने ती अजूनही शेतकºयांपर्यंत पोहोचलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.
मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस, शेळी वाटप व अनुदानित गो-शाळांना गौरवपत्रांचे वितरण महापशुधन एक्स्पोत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काही कळत नाही. पण, शेतकºयांचे अश्रू पुसायला हवेत हे निश्चित कळते. एरवी मार्च-एप्रिलमध्ये येणारा दुष्काळ यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्येच धडकला. या संकट काळात मिळेल तितकी मदत कमीच वाटते. पण, खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अर्जुन खोतकर यांनी सजा वा मजा म्हणून खात्याकडे न बघता खात्याच्या माध्यमातून जनसेवेचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
१ लाख दुभती जनावरे वाटणार - खोतकर
महाराष्ट्रातील एकूण दुधापैकी ७३ टक्के दुधाचा पुरवठा प. महाराष्ट्रातून होतो. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा वाटा १७ टक्केच आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. आगामी काळात १ लाख जनावरे शेतकºयांना देऊ, अशी घोषणा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. खोतकर म्हणाले, ‘दानवे, पशुसंवर्धन विभाग ही शिक्षाच होती. पण, अधिकारी, कर्मचाºयांनी भारतभ्रमण करून हे प्रदर्शन घडवून आणले.’
एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतं
मी इस्रायलमध्ये गेलो होतो. तेथे मुद्दाम पशुपालन बघितले. एका वाड्यात हजार जनावरे होती आणि दारात फक्त एक माणूस. मी त्यांना विचारलं किती माणसं जनावरे सांभाळतात, त्यावर ते म्हणाले फक्त एक माणूस. ते मी जाणून घेतले, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितली.
तिथला माणूस म्हणाला, वाड्याचा दरवाजा उघडल्यावर एक सायरन वाजवला जातो. सर्व जनावरे बाहेर जातात. अडीच फूट गवतात दोन तास चरल्यानंतर पुन्हा सायरन वाजवला जातो. जनावरे पाणी पितात. तिसºया सायरनला जनावरे पुन्हा वाड्यात येतात. आपल्याकडे एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतं, असे सांगताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.