आपण आमदारकीच्या काळात विकासालाच महत्त्व दिले- गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:38 IST2019-10-05T00:37:44+5:302019-10-05T00:38:57+5:30
आमदारीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण केवळ विकासालाच महत्व दिले. या कालावधीत विकासरूपी पंचपकवान आपण मतदारापर्यंत पोहोचविले असून, कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही, असा प्रतिटोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावला.

आपण आमदारकीच्या काळात विकासालाच महत्त्व दिले- गोरंट्याल
जालना : आमदारीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण केवळ विकासालाच महत्व दिले. या कालावधीत विकासरूपी पंचपकवान आपण मतदारापर्यंत पोहोचविले असून, कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही, असा प्रतिटोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावला.
गोंदेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी रवींद्र राजन, विलास जगधने, संजय पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरंट्याल म्हणाले, जालना विधानसभा मतदार संघात जायकवाडी-जालना ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करताना अनेक अडचणी आल्या. त्यावेळी आपल्याच पक्षाची सत्ता असताना आपण पक्षाच्याविरूध्द उभे राहून योजनेचे काम मार्गी लावले. याशिवाय रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज आदी विकासाची कामे मार्गी लावून विकासरूपी पंचपकवान आपण जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
मतदारांनी पुन्हा संधी दिली तर विद्यमान आमदाराप्रमाणे केवळ ‘चॉकलेट’ देणार नाही तर विकासाचे पंचपकवान जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द गोरंट्याल यांनी दिला. यावेळी देविदास खंदारे, लक्ष्मण खंदारे, उत्तम खंदारे, अप्पा खंदारे, कैलास घोरपडे, शेषराव खंदारे, अण्णा खंदारे, प्रमोद खंदारे, विकास पाखरे, योहान खंदारे आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.