अपघातात तरुण ठार; एक जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:28 AM2018-11-29T00:28:02+5:302018-11-29T00:28:21+5:30
विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन -जाफराबाद मार्गावरील विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला.
तर या अपघातात दीपक छगनराव देशमुख (३३ रा. पिंपळगाव रेणुकाई) हा गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान नीलेश नरवडे व दीपक देशमुख हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच २८ ए. डब्लू ५४३४ या गाडीवर भोकरदनकडून पिंपळगाव रेणुकाई या आपल्या गावाकडे जात असताना विरेगाव जवळच्या पुलाजवळ जाफराबाद कडून भोकरदन कडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराने धडक दिली. नीलेश जागीच ठार झाला.
दीपक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात डॉ कल्याणी बडवे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद ला हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी गणेश पायघन, सूर्यवंशी, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. भोकरदन पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातात मयत झालेला नीलेश नरवडे हा पिंपळगाव रेणुकाई येथील उपसरपंच पंडितराव नरवडे यांचा मुलगा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भोकरदन तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढल्याने चिंतेचा विषय बनला असल्याचे पोलिसांनी सांगितले.