पिस्तूल बाळगणारा युवक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:54 AM2019-11-19T00:54:58+5:302019-11-19T00:55:08+5:30

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला दरोडा प्रतिबंधक पथकाने (एडीएस) जेरबंद केले.

Young man holding a pistol | पिस्तूल बाळगणारा युवक जेरबंद

पिस्तूल बाळगणारा युवक जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला दरोडा प्रतिबंधक पथकाने (एडीएस) जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी सकाळी बदनापूर शहरातील वाल्ला रोडवर करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश राजू जऊळकर (२१ रा. शेंद्रा एमआयडीसी गंगापूर जहाँगीर अष्टविनायक वसाहत ता. औरंगाबाद) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. जऊळकर याच्याकडे गावठी पिस्तूल असून, तो औरंगाबादहून बदनापूर मार्गे उज्जैनपुरीकडे बसने जात असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पो.नि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सोमवारी सकाळी बदनापूर येथे सापळा रचला. त्यावेळी खाटिक गल्ली जवळून वाल्ला रोडने पायी जाणा-या ऋषिकेश जऊळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे ४० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. अधिक चौकशी केल्यानंतर पिस्तूल मित्राचे असल्याचे त्याने सांगितले.
या प्रकरणी पोहेकॉ ज्ञानदेव नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश जऊळकरसह दोघाविरूध्द गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोहकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण यांच्या पथकाने केली.
सोशल मीडियावर गावठी पिस्तुलासह फोटो टाकण्यात आले होते. सोशल मीडियावरील पोस्टवरून हे पिस्तूल प्रकरण पोलिसांच्या समोर आले. माहिती गुप्त ठेवून पोलिसांनी या पिस्तुलाचा छडा लावला असून, एका युवकालाही ताब्यात घेतले आहे. तर दुस-या युवकाचा शोध लवकरच घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Young man holding a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.