युवकाने पथसंचलनात वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:05 AM2019-01-28T01:05:11+5:302019-01-28T01:06:17+5:30
जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील युवक गजानन बबनराव मिसाळ यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलातील डीएआरई -सिग्नल कोर या तुकडीतून उत्कृष्ट मोटासायकल संचलनात दुसऱ्यांदा सहभाग नोंदविला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील युवक गजानन बबनराव मिसाळ यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलातील डीएआरई -सिग्नल कोर या तुकडीतून उत्कृष्ट मोटासायकल संचलनात दुसऱ्यांदा सहभाग नोंदविला आहे. जालन्याच्या युवकाला ही नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात आपल्याला जाता यावे ही गजाजन मिसाळची पूर्वीपासूसनची इच्छा होती. ती प्रत्यक्षात उतरल्याचा मोठा आनंद असल्याचे गजानन मिसाळ यांनी सांगितले. यापूर्वी देखील अशी संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात मिसाळ व त्यांचे एकूण ३८ सहकारी जवान सहभागी झाले होते. मोटासायकलवरून ही सलामी राष्ट्रपतींना द्यावी लागते. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्यावेळी क्षुल्लक चूकही आपल्या देशाची मान खाली घालवते. त्यामुळे या मोटासायकलवरून सलामी देण्याच्या पथकात सहभागी होताना अत्यंत कसून तयारी करून घेतली जाते.
या तयारीत आपण सलग दुस-यांना यशस्वी झाल्याने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. उत्कृष्ट सलामीबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला. महाराष्ट्रातून एकूण आठ जणांचा समावेश होता होता, तर मराठवाड्यातून गजानन मिसाळ हे एकमेव जवान होते. गजानन यांचे प्राथमिक शिक्षण मांडवा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण हे मस्य्योदरी महाविद्यालयात झाले आहे.