कर्जत येथे युवकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:39 AM2018-06-28T01:39:40+5:302018-06-28T01:40:02+5:30
कर्जत येथील एका १७ वर्षाच्या मुलासोबत विहिवाता पळून गेल्याचा राग मनात धरून त्या युवकाचा काटा काढण्यात आला. जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाल्याचे घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : तालुक्यातील कर्जत येथील एका १७ वर्षाच्या मुलासोबत विहिवाता पळून गेल्याचा राग मनात धरून त्या युवकाचा काटा काढण्यात आला. जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाल्याचे घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कर्जतजवळच राजपूतवस्ती आहे. या वस्तीतच राहुल खोकड वय १७ हा राहत होता. याच दरम्यान त्यांच्याच नात्यातील एका विववाहीतेने त्याला फूस लावून गुजरातला तीन महिने पळवून नेले होते. तीन महिन्यानंतर हे दोघेजण कर्जत येथे घरी आल्यावर विवाहीतेच्या नातेवाईकांनी राहुलच्या विरोधात तक्रार दिली. मात्र नंतर ही तक्रार मागे घेत दोन्ही बाजूंकडील नातेवाईकांमध्ये समेट घडली.या नंतर राहुल खोकड याने कर्जत सोडून देऊन जालन्यात एका कंपनीत करत होता. २५ जून रोजी तो रात्री त्याच्या कर्जत येथील घरी गेला असता. २६ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास विवाहितेच्या दोघा दिरासह विवाहितेच्या सासूने राहुलला त्याच्याच घरात घसून दरवाजा लावून लोखंडी रॉड तसेच काठीने जबर मारहाण केली.
यावेळी राहुलेचे आई-वडिल हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करून बाजूला ढकलून दिले. या मारहाणीच्या घटनेने परिसरातील शेतात काम करणारे राहुलचे अन्य नातेवाईकही घराजवळ आले होते. मात्र कडी लावल्याने दरवाजा बंद होता. ही मारहाण एवढी जबर होती की, राहुलच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. शेवटी धरमसिंग बमनावत यांनी माराहाण सुरू असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी राहुल जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने बैलगाडीने कर्जत आणि नंतर रिक्षाने अंबड येथे आणले. परंतु तो गंभीर जखमी असल्याने त्याला जालन्याच्या एका खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले. तेथेही त्याला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.
तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी राहुलची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्याला औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात नेण्याचे सांगितले. घाटीत नेत असतानाच राहुलचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती घाटीतील वैद्यकी अधिकाºयांनी दिली.
घाटीतच राहुलचे शवविच्छेदन करण्यात आले. एका खाजगी वाहनातून त्याचे पार्थिव नातेवाईकांनी कर्जतला न नेता ते थेट अंबड येथील पोलीस ठाण्यात आणले. जो पर्यंत राहुलच्या मारेकºयांना अटक होणार नाही, तो पर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा घेतल्याने बुधवारी दुपारी अंबड पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती.
यावेळी पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर व त्यांच्या सहकाºयांनी मध्यस्थी करून एका संशयितास ताब्यात घेतल्याचे सांगितल्यावर राहुलच्या नातेवाईकांनी येथून काढता पाय घेतला.
या प्रकरणी राहुल खोकडच्या आई जमनाबाई खोकड यांच्या तक्रारीवरुन ढवळाबाई मंच्छाराम खोकड, पूनम मंच्छाराम खोकड व रमेश मंच्छाराम खोकड या तिघांविरुध्द भादंवि ३०२, ४५२ व ३४ नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेख करत आहेत.एकूणच या सर्व प्रकारामुळे कर्जत तसेच अंबड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.