झिंगा गॅगचा फर्दाफाश, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:28 AM2018-10-10T00:28:39+5:302018-10-10T00:29:22+5:30

जालना शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या झिंगा गँगचा चंदनझिरा पोलीसांनी पर्दाफाश केला असून, पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून २ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Zinga Gogh fraud, three arrested | झिंगा गॅगचा फर्दाफाश, तिघांना अटक

झिंगा गॅगचा फर्दाफाश, तिघांना अटक

Next
ठळक मुद्देसव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : चंदनझिरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या झिंगा गँगचा चंदनझिरा पोलीसांनी पर्दाफाश केला असून, पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून २ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेख समीर (रा. सुंदरनगर) सचिन पाटीलबा झिगे (रा. मठ पिंपळगाव), शंकर भाऊसाहेब कान्हरे (रा. बाजार गेवराई) यांना अटक करण्यात आली असून, हिरालाल बंडूसिंग जारवाल (रा, अष्टविनायक नगर), विनोद शिरगुळे (रा. सुंदरनगर), हे दोघे फरार झाले आहे.
८ आॅक्टोबर रोजी प्रभाकर माधव पवार (रा.चंदनझिरा) हे राजूर चौफुली येथे एका चहाच्या हॉटेलवर चहा पित असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल चोरुन नेला. त्यानंतर त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा सुंदरनगर येथील विनोद शिरगुळे व त्याच्या साथीदारने मिळून केला आहे. यावरून त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपीचा शोध घेत असतांना यात सदर गुन्ह्यातील आरोपी सोबत त्यावेळेस सुंदरनगर येथील शेख समीर हा देखील असल्याची महिती मिळली. त्यावरून शेख समीरचा शोध घेवून सुंदरनगर येथून शेख समीरला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता, त्याने सदर चोरी विनोद शिरगुळे, सचिन झिंगे, शंकर कान्हरे, हिरालाल जारवाल यांच्या सोबत केल्याची कबुली दिली. यातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर हिरालाल जारवाल, विनोद शिरगुळे हे फरार झाले आहे. त्यांच्याकडून ९० हजार ८०० रुपये किंमतीचे १३ मोबाईल व १ लाख ३० हजार रुपयांच्या तीन दुचाकी असा एकूण २ लाख २० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार, पोउपनि.सी. जी. गिरासे, सुनिल इंगळे, प्रमोंद बोंडले, सपोउपनि. डी. के. ठाकूर, कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भंडागे यांनी केली.
मोबाईल हिसवून घेवून पळून जायचे
झिंगा गँग ही बोलत चालणाºया व्यक्तींचा पाठीमागून सुसाट वेगाने दुचाकीवर जावून मोबाईल हिसकावून घेवून पळून जयाचे, अशी माहिती पोलीसांनी दिली.
२२ आॅक्टोबरपर्यंत कोठडी
शेख समीर, सचिन पाटीलबा झिगे, शंकर भाऊसाहेब कान्हरे यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने २२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Zinga Gogh fraud, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.