जि.प. सदस्यांच्या भूमिकेने पालकमंत्री टोपे अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:30 AM2021-04-27T04:30:59+5:302021-04-27T04:30:59+5:30
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जिल्हा परिषदेला मिळणारा सेस निधीदेखील अडचणीत आला आहे. त्यातून हे १८ कोटी रुपये मिळाल्यावर जि.प. सदस्यांनी ...
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जिल्हा परिषदेला मिळणारा सेस निधीदेखील अडचणीत आला आहे. त्यातून हे १८ कोटी रुपये मिळाल्यावर जि.प. सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यातून आपल्या गटांमध्ये काही कामे केल्याचे दाखवून मतदारांसमोर जाता येईल असे वाटत असताना टोपे यांनी हे मनसुबे धुळीस मिळविल्याचा गंभीर आरोप दोन्ही सदस्यांनी केला आहे. यामुळे आता जि.प.मध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. विशेष म्हणजे नियोजन समितीचा निधी कुठे खर्च करायचा हा या समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्र्यांचा अधिकार असतो. परंतु या खर्चाचे नियोजन करताना सदस्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. ते न झाल्यानेच हा वाद पेटला आहे. या मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती.