1 वेळा पेरणी 2 वेळा उत्पादन
By Admin | Published: April 25, 2017 02:13 PM2017-04-25T14:13:18+5:302017-04-25T14:13:18+5:30
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले.
नंदुरबार, दि.25- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. एक वेळा पेरणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा 55 ते 60 क्विंटलर्पयत उत्पन्न मिळत असल्याने दोन वेळा उत्पादन शेतक:याला मिळणार आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये 15 जून 2016 रोजी सात एकर क्षेत्रात तूर पिकाची पेरणी केली होती.
उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी या शेतक:याने पुन्हा त्या पिकाला पाणी दिले. दोन वेळा फवारणी केली. खत टाकले आणि आता पुन्हा बहर आला आहे व शेंगाही लागत आहेत. आता पुढील एप्रिल महिन्याच्या शेवटर्पयत या पिकाची काढणी होईल. तेव्हा पुन्हा 55 ते 60 क्विंटल तूर येईल, अशी सुखदेव भोई यांना अपेक्षा आहे. म्हणजेच ‘पेरणी एक वेळा, उत्पन्न दोन वेळा’ असे प्रत्यक्षात होणार आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ाला शेतक:याने पूर्ण पिकांच्या झाडांची तोडणी न करता फक्त शेंगा तोडल्या. सात दिवसांत सर्व शेंगांची तोडणी झाली. ते खळ्यात आणून मशीनद्वारे दाणे काढले तर त्यांना सात एकरमध्ये 60 क्विंटल उत्पन्न निघाले.
एकरी दोन माणसे याप्रमाणे 14 मजुरांनी सात एकर शेतात तीन दिवसांत तूर दाणे टोचले अर्थात पेरणी केली. त्यानंतर कूपनलिकेचे पाणी भरले. त्यातच पावसाचे पाणी मिळाले. अधून-मधून शेणखत, सेंद्रिय खत, युरिया टाकण्यात आला.
डिसेंबर-जानेवारीतच तुरीची झाडे पाच ते सात फुटांर्पयत वाढली. लागवड करताना प्रमाण समान ठेवल्याने पीकही बहारदार झाले. चारीत पाच फुटांचे अंतर तर दोघा पिकांतील अंतर एक फूट ठेवले होते.
सूर्यप्रकाश व पुरेसे पाणी मिळाल्याने या पिकाची झाडे सहा ते सात फूट वाढली. फुलांचा बहरही येऊन शेंगाही खूप लागल्या. यामुळे परिसरातील शेतकरी पीक पाहण्यासाठी गर्दी करू लागले.