चोपडा- हातेड रस्त्यावर ट्रक अपघातात १ ठार, १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:08 PM2019-05-02T21:08:31+5:302019-05-02T21:09:08+5:30

मोटरसायलला दिली धडक : रस्त्याच्या बाजुला ट्रकही उलटला

1 dead, 18 injured in road accident in Chopda-Heded road | चोपडा- हातेड रस्त्यावर ट्रक अपघातात १ ठार, १८ जखमी

चोपडा- हातेड रस्त्यावर ट्रक अपघातात १ ठार, १८ जखमी

Next



चोपडा : अंकलेश्वर- बºहाणपूर महामार्गावर चोपडा- हातेड दरम्यान काजीपुरा फाट्याजवळ मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास ठोस दिली यात ट्रक उलटून १८ मजूर जखमी झाले तर दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
हा अपघात १ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान झाला. किनगाव ता. चोपडा येथुन लासुर ता.चोपडा येथे कांदे भरण्यासाठी मजूर व कट्टे घेऊन जात असतान एम. एच. १९/ बी. एम. ८०८ या ट्रकची समोरून येणाºया एम. पी. ४६ /एम.एम. ३७३१ या क्रमांकाच्या दुचाकीस धडक बसून ट्रक उलटला. या अपघातात दुचाकीस्वार मंसाराम डोंगरसिंग बारेला (वय ३२) रा. दुगानी ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच यातील गंभीर जखमी इर्शाद हमीद तडवी (१९) , नूरजहाँ हमीद तडवी (४८) , हमीदाबी रमजान तडवी (४५), हमीदा रमजान तडवी (४२), बैतूलबी सुभान तडवी (४५), लुकमान अरमान तडवी (२५), यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात आली तर अझरुद्दीन हमीद तडवी (१८) , गोपाल दगडू महाजन (२५) किनगाव, सिमरन सुपडू तडवी (१४), राजू सिकंदर तडवी (२२), खातूनबी रहेमान तडवी (६०), हमीदा नत्थु तडवी (३४), साहिल सुपडू तडवी (१८), मेहमूदाबी नथ्थु तडवी (४०), ऐनूरबी कलिंदर तडवी (५०), शाहिद शरद तडवी (१९), शेखर गंभीर तडवी (२३), खातूनबी सायबू तडवी (२५) या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात चोपडा येथे डॉ. पंकज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ व डॉ. सपना पाटील यांनी उपचार केले.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय मनीलाल देवराज रा. किनगाव यांच्या फियार्दीवरून वाहन चालक उत्तमसिंग जयसिंग पवार रा. फोपणार ता. बºहाणपूर, हल्ली मुक्काम कुसुंबा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार काशिनाथ पाटील हे करीत आहे.

Web Title: 1 dead, 18 injured in road accident in Chopda-Heded road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.