बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:13 PM2019-09-23T19:13:50+5:302019-09-23T19:14:23+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागाच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता आॅनलाईन ...
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ विभागाच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३० सप्टेंबरपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे.
तळागाळातील व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, अथवा नोकरी करीत असल्यामुळे, घराची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे पदवीधर होता आले नाही, अशा विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व व्यवसाय करणाऱ्यामहिला, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, सेवा निवृत्त अधिकारी-कर्मचारी अशा सर्वांसाठी बहि:स्थ पद्धतीने प्रवेश सुरु करून शिक्षण प्रवाहात ग्रामीण जनतेला प्राधान्याने उच्च शिक्षणापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी पुढाकार घेतला आहे़ या विभागातर्फे बी.ए. (सामान्य विषय ), बी.कॉम. तर मराठी, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षण व सामरिक शास्त्र, हे विषय घेऊन एम.ए. करता येईल आणि एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.कॉम., एल.एल.एम. (कायदा व विधी) हे अभ्यासक्रम देखील करता येणार आहे.