'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली तरुणीची १ लाख ३८ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:40+5:302021-06-09T04:19:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदनगरातील तरुणीची 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली १ लाख ३८ हजार ७८० रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदनगरातील तरुणीची 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली १ लाख ३८ हजार ७८० रुपयांची एकाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आनंदनगरात धनश्री राजेंद्र भावसार ही तरुणी कुटुंबीयांसह राहते. ३ जून रोजी ही तरुणी ऑनलाइन नोकरी शोधत होती. त्यासाठी तिने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केला. त्यानंतर त्या संकेतस्थळावरील एका व्यक्तीने तिला संपर्क साधला. नंतर नोकरीसंदर्भातील माहितीच्या वेगवेगळ्या सुविधा मिळतील असे आमिष दाखवून प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी एकूण १ लाख ३८ हजार ७८० रुपयांची रक्कम घेतली. मात्र, काही वेळेनंतर आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी धनश्री हिने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत नोकरी डॉट कॉमवरून बोलणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.