भुसावळ येथे १ लाख ९७ हजार रुपये जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:03 PM2019-04-10T12:03:24+5:302019-04-10T12:03:58+5:30

निवडणूक पथकाची वाहनावर कारवाई

1 lakh 97 thousand rupees were seized at Bhusawal | भुसावळ येथे १ लाख ९७ हजार रुपये जप्त

भुसावळ येथे १ लाख ९७ हजार रुपये जप्त

Next

जळगाव / भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहन तपासणी मोहीम सुरू असून या मोहिमेत सोमवारी रात्री स्थिर स्थाई पथकाने भुसावळ येथे राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव नाक्यावर एका हॉटेलजवळ कारमधून एक लाख ९७ हजार ५०० रुपये जप्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू असून त्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले आहे. सोमवारी रात्री भुसावळ येथे पथक प्रमुख एम. आर. दुसाने, तालुका पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार पद्माकर महाजन यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर वरणगाव नाक्यावर एका हॉटेलजवळ वाहनाची (क्र. एम.एच. १९, बीयू ७६९५) तपासणी केली असता विलास जयराम पाटील (रा. शांतीनगर, भुसावळ) यांच्या वाहनाच्या मागील डिक्कीत १ लाख ९७ हजार ५०० रुपये आढळून आले. सदर रक्कम पथकाने जप्त केली.
ही गाडी भुसावळ येथील विलास जयराम पाटील यांच्या मालकीची असून वाहन चालक ऋतुराज सिंग ठाकूर यांनी ही रक्कम ठेकेदारीतील कामगारांच्या पगारासाठी नेली होती, अशी माहिती पथकाला दिली. मात्र काही कारणास्तव पगार वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे ही रक्कम परत आणल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे. पथकाने रात्री ११.३० वाजता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी ही रक्कम रात्री तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ही रक्कम कोषागारमध्ये जमा करण्यात आली.
दुसरी कारवाई
६ रोजी दुपारी ४.१० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ एका वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात ४ लाख ४० हजार रुपये आढळून आले होते. त्या रक्कमेची अद्यापही चौकशी सुरूच आहे. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी राष्ट्रीय महामार्गाजवळ एका वाहनात रक्कम जप्त करण्यात आली.

Web Title: 1 lakh 97 thousand rupees were seized at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव