दहावी फेरपरीक्षेत तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी ‘नापास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:34 PM2017-08-29T14:34:08+5:302017-08-29T14:36:22+5:30
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.२९,-महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत.
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी जुलै महिन्यात फेर परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातुन २ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी २ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रिया जरी संपली असली तरी दहावी फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना अतिरीक्त जागांसाठी सूचना पाठविली जाणार आहे. तसेच या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही त्या दृष्टीने विज्ञान शाखेत सुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना बुधवारी पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.