गिरणा धरणात ५४ टक्के पाणी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 07:07 PM2019-08-07T19:07:40+5:302019-08-07T19:09:34+5:30

नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी, केळझर या पाच धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा धरणात बुधवारी सायंकाळी सहापर्यंत एकूण ५४.९५ टक्के पाणी साठा होता.

1% water reservoir in milling dam | गिरणा धरणात ५४ टक्के पाणी साठा

गिरणा धरणात ५४ टक्के पाणी साठा

Next
ठळक मुद्देपाच धरणातून पाण्याचा विसर्ग धीम्या गतीनेबुधवारी सायंकाळी सहापर्यंत एकूण ५४.९५ टक्के पाणी साठा

चाळीसगाव, जि.जळगाव : नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी, केळझर या पाच धरणातून गिरणा धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा धरणात बुधवारी सायंकाळी सहापर्यंत एकूण ५४.९५ टक्के पाणी साठा होता.
चनकापूर धरणातून ५०७५ क्युसेस, पुनद धरण १३४२ क्युसेस, ठेंगोडा धरण ६३११ क्युसेस, हरणबारी धरण २५८८ क्युसेस, केळझर धरणातून ८३९ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
७ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा धरणात १३ हजार १६६ दशलक्ष घन फूट इतका म्हणजे ५४.९५ टक्के पाणी साठा होता. नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचा फ्लो कमी झाला आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर.पाटील यांनी दिली.

Web Title: 1% water reservoir in milling dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.