महामार्ग दुरूस्तीसाठी 10 कोटी
By admin | Published: February 4, 2017 12:52 AM2017-02-04T00:52:11+5:302017-02-04T00:52:11+5:30
दिल्ली येथील ‘नही’च्या कार्यालयाकडून मान्यता : निविदा प्रक्रियेनंतर कामास प्रारंभ
जळगाव : राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत नाही तोर्पयत दैना झालेल्या महामार्गाची डागडुजी आणि साईपट्टय़ांच्या कामांसाठी 10 कोटी 84 लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या दिल्ली कार्यालयाने मंजूर केले आहे. या रक्केतून आता चिखली ते जळगावर्पयतच्या महामार्गावर पडलेले खड्डे बुजविले जाणार असल्याची माहिती ‘नही’च्या सूत्रांनी दिली.
गेल्या महिन्यात जिल्हा दौ:यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी चौपदरीकरणाच्या कामाला विलंब होत असल्यामुळे तूर्तास किमान डागडुजीची कामे तसेच साईडपट्टया भरण्याची कामे हाती घ्यावीत असे आदेश ‘नही’च्या अधिका:यांना देण्यात आले होते. त्यानुसार अधिका:यांनी 10 कोटी 84 लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आता तत्काळ निविदा प्रक्रिया करण्याचे आदेश नहीच्या विभाग कार्यालय (नागपूर) ला आदेश देण्यात आले आहेत.
समांतर रस्त्यासाठी आज जाहीर सभा
4राष्ट्रीय महामार्गावरील रेंगाळलेला समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने अनेकांचा बळी जाऊन महामार्ग मृत्यूमार्ग बनला आहे. वारंवार मागणी करून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शहरातील 20 सामाजिक संघटनांनी एकत्र येत हा प्रश्न मार्गी लावण्याची हाक दिली आहे. त्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता जयप्रकाश नारायण चौकात जाहीर सभा होत आहे. सभेत अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव, प्रा.डी.डी. बच्छाव, सी.ए. अनिल शाह, अपघात पीडिताची आई स्वाती अहिरे, नगरसेविका अॅड. सुचिता हाडा, अश्विनी देशमुख, नगरसेवक कैलास सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, शंभू पाटील, मुकुंद सपकाळे, सचिन नारळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
समांतर रस्त्यांच्या अहवाल सादर करा-महापौर
समांतर रस्त्यांच्या जागेबाबत तत्काळ अहवाल सादर करावा असे आदेश महापौर नितीन लढ्ढा यांनी आयुक्तांना दिले आहेत. मनपा हद्दीतील खेडी शिवार ते खोटे नगर्पयत राष्ट्रीय महामार्गाला लागून हे समांतर रस्ते आहेत. महामार्गाच्या दुतर्फा 9 मीटर रूंदीचे समांतर रस्ते जमीन मालकांनी लेआऊट विकसीत करताना महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहे काय? एकूण किती लांबीचे हे रस्ते मनपाकडे हस्तांतरीत झाले, त्या संदर्भात परिपूर्ण अहवाल तातडीने सादर करावा असे या पत्रात नमूद केले आहे.
‘नही’च्या दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यानुसार लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल.
-अरविंद काळे, प्रकल्प संचालक ‘नही’, धुळे