वादळामुळे रावेर तालुक्यात 10 घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 03:59 PM2017-05-26T15:59:11+5:302017-05-26T15:59:11+5:30
केळी उन्मळून पडल्याने साडे पाच लाखाचे नुकसान. तालुका प्रशासनाने सादर केला प्राथमिक अंदाज
Next
>ऑनलाईन लोकमत
रावेर,दि.26 - तालुक्यात गुरूवारी दुपारी बसलेल्या वादळी तडाख्यात पाल येथील 10 घरांचे टीनपत्र्यांचे छत उडून 35 हजार रुपयांचे तर रसलपूर व खिरोदा प्र. रावेर येथील 10 शेतक:यांची 16 हेक्टर केळी भुईसपाट झाली. या वादळात 5 लाख 35 हजार रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
रावेर तालुक्यात गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळात पाल येथील 10 घरांचे टीनपत्र्यांचे छत उडून अंदाजे 35 हजार रू चे नुकसान झाले. दरम्यान, रसलपूर व खिरोदा प्र रावेर शिवारातील 10 शेतक:यांचे 16 हेक्टर क्षेत्रातील केळी उन्मळून भुईसपाट झाली आहे. तहसीलदार विजयकुमार ढगे व गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे.