१० गाठींमुळे गर्भपेशी झाली वजनदार, अवघड शस्त्रक्रियेने उघडले आयुष्यद्वार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:16 PM2023-12-15T16:16:57+5:302023-12-15T16:17:42+5:30

गूड न्यूज, गरीब महिलेसाठीसाठी सरसावले जिल्हा रुग्णालय.

10 tumors made the fetus heavy, difficult surgery opened the door to life in jalgaon | १० गाठींमुळे गर्भपेशी झाली वजनदार, अवघड शस्त्रक्रियेने उघडले आयुष्यद्वार!

१० गाठींमुळे गर्भपेशी झाली वजनदार, अवघड शस्त्रक्रियेने उघडले आयुष्यद्वार!

कुंदन पाटील,जळगाव : हलाखीची परिस्थिती. त्यातच गर्भपेशीला गाठी जडल्या. त्याही दहा. त्यामुळे दोन्ही गर्भपेशींचे वजन ४ आणि ५ किलो झाले. हातावर पोट असणाऱ्या या महिलेचे जगणे असह्य झाले. तेव्हा वेदनाही छळायला लागल्या. प्रयत्न म्हणून जिल्हा रुग्णालय गाठले. तेव्हा गाठींचे निदान झाले आणि तिथले प्रशासनही शस्त्रक्रिेयेसाठी सरसावले. अखेरीस मोहाडी येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयात महिलेच्या गर्भपेशीतील १० गाठी नाजूकपणे काढल्या. फाटक्या आयुष्याला शिवण्यासाठी. गरीब महिलेला नवआयुष्य देण्यासाठी.

गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी तपासणीसाठी आलेल्या पहिल्या महिला रुग्णाची गर्भ पिशवीतील सूजेने आतडी चरबीत बाधा झाली होती. गर्भपिशवीत गुंतागुंत निर्माण झाली होती. दुसऱ्या महिला रुग्णाची गर्भपिशवीत १० गाठी झालेल्या होत्या.  दोन्ही गर्भपिशवीचा आकार मोठा असून वजन अनुक्रमे ४ व ५ किलो ग्रम होते. त्यांना खासगी रुग्णालयात अंदाजे दीड ते दोन लाखापर्यंत खर्च सांगण्यात आला होता.

या रुग्णांची परिस्थिती गरिबीची असून हे रुग्ण महिला रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनावणे यांना भेटले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना ही माहिती दिली. डॉ.पाटील यांनी स्वतः शस्रक्रिया करण्यास तयारी दाखविली. त्यानुसार निदान करणारे हात शस्त्रक्रिेयेसाठी सरसावले. सोबतीला डॉ. किरण सोनवणे (भूलतज) डॉ, गुरुप्रसाद वाघ, डॉ. रुपाली कळसकर, डॉ. प्राची सुरतवाला व नर्सिंग स्टाफ रुपाली पाटील, नजमा शैख, मीना चव्हाण, सविता बिऱ्हाडे, दिपाली बढ़े, दिपाली किरगे व शस्रक्रिया विभागातील कर्मचाऱ्यांनीही धाव घेतली आणि नाजूकशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे आटोपली. आता या महिलेची प्रकृती उत्तम आहे. तिच्या वेदनाही पुसल्या गेल्या आहेत आणि संकटाचा भारही कमी झाला आहे.

Web Title: 10 tumors made the fetus heavy, difficult surgery opened the door to life in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.