जिल्ह्यातील १० शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:21+5:302021-01-15T04:14:21+5:30

जळगाव : शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातही काळाबाजार त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याच्या गोष्टी संस्थाचालकांकडून होत आहेत. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत १० ...

10 unauthorized schools in the district | जिल्ह्यातील १० शाळा अनधिकृत

जिल्ह्यातील १० शाळा अनधिकृत

Next

जळगाव : शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातही काळाबाजार त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याच्या गोष्टी संस्थाचालकांकडून होत आहेत. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत १० शाळा अनधिकृत असल्याची बाब पुढे आली आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोनाने कहर केल्यामुळे या वर्षात शाळाच सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे किती शाळा अनधिकृत आहेत, याची तपासणी झालेली नाही. परवानगी न घेताच शाळा सुरू करण्यात येतात. शाळा सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी न घेता सरळ शाळा सुरू करून त्यात मुलांना प्रवेश देण्याचे काम केले जाते. २०१९-२० या वर्षात जळगाव जिल्ह्यात आढळलेल्या अनधिकृत शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली आहे़. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार, याचदरम्यान कोरोनाने कहर केल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई थंडबस्त्यात होती. त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही प्राथमिक शाळा बंद आहेत. दरम्यान, दुसरीकडे अनधिकृत शाळांमधील काही शाळांनी शासनाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे त्या शाळा युडायसमध्ये अनधिकृत दिसत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ज्या शाळा अनधिकृत आहेत, त्या शाळांमध्ये पाल्यांचे प्रवेश करू नका, असे आवाहन नेहमी शिक्षण विभागाकडून होत असते. परंतु ग्रामीण भागातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या शाळांत करवून घेतले जातात.

अनधिकृत शाळेत घेत आहेत ३५९ विद्यार्थी शिक्षण

जळगाव जिल्ह्यात अनधिकृत आढळलेल्या शाळेत ३५९ विद्यार्थी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. दरम्यान, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शाळांची तपासणी न झाल्यामुळे या वर्षात किती शाळा अनधिकृत आहेत व किती विद्यार्थी प्रवेशित आहे, याबाबत शिक्षण विभागात माहिती नाही.

नोटीस बजावल्या

२०१९-२० या वर्षात अनधिकृत आढळलेल्या दहा शाळांना गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यांनी आपल्या शाळा त्वरित बंद करा, असेही सूचविण्यात आले. दरम्यान, यंदा कोरोनामुळे शाळाच उघडल्या नसल्यामुळे कारवाई प्रस्तावित आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तपासणी होऊन किती शाळा अनधिकृत आहेत, त्यांची चौकशी होऊन कारवाई केली जाणार आहे.

तालुकानिहाय अनधिकृत शाळा संख्या

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात (२), भडगाव (१), चाळीसगाव (१), चोपडा (३), पारोळा (१), जळगाव शहर (२) अशा एकूण दहा शाळा आहेत.

Web Title: 10 unauthorized schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.