पानी फाउंडेशनतर्फे अमळनेरातील १० गावे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:40+5:302021-07-21T04:12:40+5:30
तालुक्यातील अनोरे येथील पानी फाउंडेशनच्या माध्यमातून गावांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरणप्रसंगी काढले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावांना ‘फाइव्ह स्टार’ बनविण्याची पंचसूत्री ...
तालुक्यातील अनोरे येथील पानी फाउंडेशनच्या माध्यमातून गावांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरणप्रसंगी काढले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावांना ‘फाइव्ह स्टार’ बनविण्याची पंचसूत्री सांगितली. यात शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता व वारंवार हात धुण्यास सांगितले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, जिल्हा कृषी अधिकारी अनिल भोकरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपस्थित होते.
पानी फाउंडेशनवर आधारित भजनाच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत झाले. यावेळी तालुक्यातील डांगर बु., तांदळी, गांधली, नगाव बु., नगाव खु., पातोंडा, निम, मंगरूळ, दहीवद, अनोरे या गावच्या सरपंच व ग्रामस्थांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
भोसले यांनी समृद्ध गाव स्पर्धेची पुढची वाटचाल विशद केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप पाटील यांनी अनोरे गावाचा राष्ट्रीय स्तरापर्यंत झालेला प्रवास, गावातील नागरिकांच्या श्रमाच्या माध्यमातून ३५० हेक्टर क्षेत्राचे पाणी शेतातच कसे अडविले याची माहिती दिली.
यावेळी तालुक्यातील पारितोषिक पात्र गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पाटील यांनी आभार मानले.
200721\20jal_6_20072021_12.jpg
अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील सरपंच व ग्रामस्थांना सन्मानित करताना अभिजीत राऊत (छाया : दिगंबर महाले)