युती सरकारने दिलेले १०० कोटी आघाडी सरकारने काढून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:30 AM2021-02-21T04:30:49+5:302021-02-21T04:30:49+5:30

जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आणली, पक्षाचा महापौर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासासाठी शंभर-शंभर कोटी रूपये दिले. मात्र, ...

The 100 crore lead given by the coalition government was withdrawn by the government | युती सरकारने दिलेले १०० कोटी आघाडी सरकारने काढून घेतले

युती सरकारने दिलेले १०० कोटी आघाडी सरकारने काढून घेतले

Next

जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता आणली, पक्षाचा महापौर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकासासाठी शंभर-शंभर कोटी रूपये दिले. मात्र, दुर्दवाने आमचे सरकार गेल्यानंतर, पैशांचे नियोजन होण्याआधीच या सरकारने मंजुर केलेले सर्व पैसे काढुन घेतल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी अमृत योजने अंतर्गंत पाणी पुरवठा योजनेच्या उद्घटनाप्रसंगी सरकारवर केली.

यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, चोपड्याचे आमदार लता सोनवणे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते भगत बालाणी, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, कैलास सोनवणे उपस्थित होते.

गिरीश महाजन यांनी शहरात अमृत व भुयारी गटारींच्या कामामुळे रस्त्यांची खुप दुरवस्था झाली आहे. जळगाव ऐवजी धुळीचे गाव अशी टीका होत आहे. मात्र, अमृतचे काम झाल्यानंतर मंजुर झालेल्या ७० कोटींच्या कामांमधून रस्त्यांचा प्रश्न लवकरात मार्गी लावणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

इन्फो :

सुरेश दादा म्हणजे विकासाचे व्हिजन

माजी मंत्री सुरेश दादा यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकाळात जळगावात १७ मजलीची इमारत झाली. ही इमारत पहायला राज्यातुन नव्हे तर देशातुन नागरिक पहायला येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

इन्फो :

गावांची निवड करतांना राजकारण केले नाही - पालकमंत्री

जिल्ह्यात ७०२ गावे अशी आहेत की, ज्यांना पाण्याचे पंपींग वाढविली पाहिजे, नवीन योजना केली पाहिजे किंवा दुरूस्ती केली पाहिजे अशी आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या कृती आराखड्यांत प्रत्येक तालुक्यातील पक्ष विरहित ७०२ गावांचा आराखडा तयार केला आहे. हे करीत असतांना तिथे कुठल्या पक्षाचा आमदार आहे, कुठल्या पक्षाचा जि.प.सदस्य आहे, याचा कुठलाही विचार ना राजकारण करता गावांची निवड केली असल्याचे पालक मंत्र्यांनी सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनीही आपल्या मनोगतात ही योजना सुप्रिम कॉलनीत राबवितांना अनेक समस्यांनाचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले. तर नगरसेवक कैलास सोनवणे यांनींही गेल्या ३० ते ४० वर्षांत येथील नागरिकांची पाण्याची समस्या मिटली असून, टप्प्याने शहरातील सर्व भागात अमृतचे पाणी लवकरच पोहचविणार असल्याचे सांगितले.

इन्फो :

परिसरात टाकली १५ किमी जलवाहिनी

अटल नवीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीसाठी १५ लक्ष लिटर्सची उंच पाण्याची टाकी १५ लक्ष लिटर्सची भूमीगत पाणी साठवण टाकी, पंप घर, ३५ एचपीचे २ पंप, १ लाख ४० हजार लीटर प्रतितास विसर्ग क्षमता, परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी ११० मिमीच्या १२८२९ मीटर, १४० मिमीच्या १७०० मीटर, १८० मिमीच्या ६१९ मीटर, २२५ मिमीच्या ३०० मीटर अशा एकूण १५ हजार ४४८ मीटर जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.

Web Title: The 100 crore lead given by the coalition government was withdrawn by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.