जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या कामासाठी 100 कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:38 PM2017-12-15T12:38:19+5:302017-12-15T12:44:56+5:30

कामाला लवकरच सुरुवात : पहिल्या टप्प्यात समांतर रस्त्याचे 16.86 किलोमीटरचे काम

100 crore sanctioned for the work of highway in Jalgaon | जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या कामासाठी 100 कोटी मंजूर

जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या कामासाठी 100 कोटी मंजूर

Next
ठळक मुद्देनिधी वर्गवरणगाव शहरातील कामांचाही समावेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15-  शहरातून जाणा:या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव समांतर रस्त्याचे 16.86 किलोमीटरचे काम सुरु करण्यात येणार आहे.
जळगाव शहरातून जाणा:या महामार्ग व त्यावरील समांतर रस्त्यांची दुरवस्था होऊन सतत अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. जळगावकराच्या जिव्हाळ्य़ाचा विषय असलेल्या शहरातील महामार्ग व समांतर रस्त्याच्या या कामासाठी विविध संस्थांनी आंदोलन करीत मागण्या लावून धरल्या होत्या. प्रशासनाने याची दखल घेत सव्रेक्षण करून डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर भोपाळ येथील एजन्सीमार्फत 444 कोटी 3 लाख 8 हजार 212 रुपयांचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नागपूर येथील विभागीय कार्यालयाला सादर करण्यात आला होता. 


निधी वर्ग
जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासह काँक्रीटीकरण व समांतर रस्ते करण्याच्या 100 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात करण्यात येणा:या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील 16.86 किलोमीटरच्या कामासाठी निधी वर्ग करण्यात आला असून त्याबाबत ‘नही’च्या अधिका:यांना सूचना देण्यात आलेल्या आहे.  

वरणगाव शहरातील कामांचाही समावेश

‘नही’कडून वरणगाव शहरातून जात असलेल्या 6.23 किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण आणि उड्डाणपूल उभारणीसाठी 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जळगाव शहरातील 100 कोटींचे काम आणि वरणगाव शहरातील 30 कोटींचे काम अशी एकूण 130 कोटींची कामे करण्यात येणार आहे.

केंद्रीय परिवहन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव शहरातून जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील विविध कामांचा शुभारंभ केला होता. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण पाठपुरावा केला होता. त्यानुसार 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
- आमदार सुरेश भोळे. 

Web Title: 100 crore sanctioned for the work of highway in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.